तमिळनाडू राज्य
तमिळनाडू राज्य : भारतीय द्वीपकल्पाच्या आग्नेय भागातील राज्य. क्षेत्रफळ १,३०,०६९ चौ. किमी. लोकसंख्या ४,११,९९,१६८ (१९७१). विस्तार ८° ४′ उ. ते १३° ५०′ उ. आणि ७६° पू. ते ८०° २१′ पू. यांदरम्यान. याच्या पश्चिमेस केरळ राज्य, उत्तरेस आंध्र प्रदेश राज्य व कर्नाटक राज्य,पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंदी महासागर व आग्नेय किनारा आणि श्रीलंका यांदरम्यान त्याचे पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात हे भाग आहेत.